Samanyarupe, Vibhakti-Smart School Infolips

सामान्यरूपे (The word's ordinary form) :


नामांना किंवा सर्वनामांना विभक्ती प्रत्येय लावण्यापूर्वी मूळ शब्दात जो फरक होतो त्यास 'सामान्यरूप' असे म्हणतात.

उदा. :
पाणी : पाण्यास, पाण्याला, पाण्याने, पाण्याचा – (या मध्ये ‘पाण्या’ हे सामान्यरूप आहे).
झाड : झाडाला, झाडाने, झाडाचा, झाडास, झाडाच्या - (या मध्ये "झाडा" हे सामान्यरूप आहे).


विभक्ती व त्याचे प्रकार :

वाक्यातील शब्दांचे एकमेकांशी संबंध प्रस्थापित करणाऱ्या बदलला 'विभक्ती' असे म्हणतात.


➽ विभक्तीचा हा संबंध आठ प्रकारचा आहे :

विभक्तीविभक्तीचे कारकार्थएकवचन प्रत्येय अनेकवचन प्रत्येय
प्रथमा कर्ता------
व्दितीयाकर्मस, ला, तेस, ला, ना, ते
तृतीयाकरणने, शी, एनी, ही, ई, शी
चतुर्थीसंप्रदानस, ला, तेस, ला, ना, ते
पंचमीअपादानऊन, हूनऊन, हून
षष्ठी---चा, ची, चेचे, च्या, ची
सप्तमीअधिकरणत, ई, आत, ई, आ
संबोधनसंबोधन---नो, भो
.

कर्ता म्हणजे काय :
वाक्यातील क्रियापदाने दाखवलेली क्रिया जो करतो त्यास 'कर्ता' असे म्हणतात.
➤ कर्त्यांची विभक्ती बहुतांशी प्रथमा असते म्हणून कर्ता हा प्रथमेचा कारकार्थ आहे.

उदा. :
➥ रुद्र नृत्य करतो. (नृत्याची क्रिया रुद्र करतो म्हणून रुद्र हा कर्ता आहे.)
➥ भावी खेळत आहे. (खेळण्याची क्रिया भावी करते म्हणून भावी हा कर्ता आहे.)
➥ वेदांती चित्र काढत आहे. (चित्र काढण्याची क्रिया वेदांती करते म्हणून वेदांती हा कर्ता आहे.)कर्म म्हणजे काय :
वाक्यातील क्रियापदाने दाखवलेली क्रिया ज्याच्यावर घडते त्याला 'कर्म' असे म्हणतात.
➤ प्रत्यक्ष कर्माची विभक्ती व्दितीया असते म्हणून कर्म हा व्दितीयेचा कारकार्थ आहे.

उदा. :
➥ हर्षाली वासरास पुसते. (पुसण्याची क्रिया वासरावर होते म्हणून वासरू हे कर्म आहे.)
➥ तन्मयी मांजरास पाणी पाजते. (पाणी पाजण्याची क्रिया मांजरावर होते म्हणून मांजर हे कर्म आहे.)

➥ स्वरा रोपट्यास रोवते. (रोवण्याची क्रिया रोपट्यावर होते म्हणून रोपटे हे कर्म आहे.)


करण म्हणजे काय :
वाक्यातील क्रियापदाने दाखवलेली क्रिया ज्या साधनाने घडते त्याला 'करण' असे म्हणतात.

➤ कारणाची विभक्ती तृतीया असते म्हणून करण हा तृतीयेचा कारकार्थ आहे.

उदा. :
भावी काठीने पक्षी उडवते. (पक्षी उडवण्याची क्रिया काठीने होते म्हणून काठी हे करण आहे.)

संप्रदान म्हणजे काय :
वाक्यातील क्रियापदाने दान देण्याची क्रिया ज्याच्यावर होते त्याला 'संप्रदान' असे म्हणतात.
➤ संप्रदानाची विभक्ती चर्तुर्थी असते म्हणून संप्रदान हा चर्तुर्थीचा कारकार्थ आहे.

उदा. :
वेदांतीने तन्मयीला कविता शिकविली. (कविता शिकविण्याची क्रिया तन्मयीवर होते म्हणून तन्मयी हे संप्रदान आहे.)

Nouns : The name given to a people, objects, birds....

Read more...

आपदान म्हणजे काय :
वाक्यातील क्रियापदाने एका ठिकाणावरून सुरु होणारी क्रिया दुसरीकडे जाऊन संपते म्हणजे तिचा वियोग होतो त्याला 'आपदान' असे म्हणतात.
➤ आपदानाची विभक्ती पंचमी असते म्हणून आपदान हा पंचमीचा कारकार्थ आहे.

उदा. :
रुद्र घरून आत्ताच बागेत आला. (रुद्रची बागेत येण्याची क्रिया घरून सुरु होते म्हणून घर हे आपदान आहे.)

अधिकरण म्हणजे काय :
वाक्यातील क्रियापदाने क्रियेचा स्थान किंवा काळ दर्शविला जातो त्यास 'अधिकरण' असे म्हणतात.
➤ अधिकरणाची विभक्ती सप्तमी असते म्हणून अधिकरण हा सप्तमीचा कारकार्थ आहे.

उदा. :
निल दररोज सकाळी व्यायाम करतो. (निलच्या व्यायाम करण्याच्या क्रियेचा काळ 'सकाळी' या शब्दातून व्यक्त होतो म्हणून 'सकाळी' हे अधिकरण आहे.)पुल्लिंगी नामांचे विभक्ती प्रत्ययाने होणारे सामान्यरूपातील बदल :
शब्द प्रकारएकवचनएक वचनाचे प्रत्येयअनेकवचनअनेक वचनाचे प्रत्येय
'अ'कारान्तघर घरा + त = घरातघरेघरां + ना = घरांना
'आ'कारान्तवाडावाड्या + ला= वाड्यालावाडेवाड्यां + ना= वाड्यांना
'ई'कारान्तकोळी कोळ्या + ने = कोळ्याने कोळीकोळ्यां + नी = कोळयांनी
'ऊ'कारान्तखडू खडू + स = खडूस खडूंखडूं + स = खडूंस
'ए'कारान्तगोखलेगोखल्यां + चा = गोखल्यांचा गोखलेगोखल्यां + च्या = गोखल्यांच्या
'ओ'कारान्तरेडिओ रेडिओ + स = रेडिओस रेडिओरेडिओं+ स = रेडिओंस


स्त्रीलिंगी नामांचे विभक्ती प्रत्ययाने होणारे सामान्यरूपातील बदल :
शब्द प्रकारएकवचनएक वचनाचे प्रत्येयअनेकवचनअनेक वचनाचे प्रत्येय
'अ'कारान्तवेल वेली + स = वेलीसवेलवेलीं + ना = वेलींस
'आ'कारान्तशाळाशाळे + ने = शाळेने शाळाशाळां + नी = शाळांनी
'ई'कारान्तनदीनदी + स = नदीसनद्या नद्यां + ना = नद्यांना
'ऊ'कारान्तकाकूकाकू + ला = काकूलाककवाककवां + ना = काकवांना
'ए'कारान्तडोकेडोक्या + स = डोक्यासडोकेडोक्यां + ना = डोक्यांना
'ऐ'कारान्तमैनामैने + ला = मैनेलामैनांमैनां + नी = मैनांनी
'ओ'कारान्तबायकोबायको + ला = बायकोलाबायकांबायकां + नी = बायकांनी


नंपुसकलिंगी नामांचे विभक्ती प्रत्ययाने होणारे सामान्यरूपातील बदल :
शब्द प्रकारएकवचनएक वचनाचे प्रत्येयअनेकवचनअनेक वचनाचे प्रत्येय
'अ'कारान्तफुलफुला + त = फुलातफुलेफुलां + त = फुलांत
'ई'कारान्तलोणीलोण्या + त = लोण्यातलोणीलोण्या + चा = लोण्याचा
'ऊ'कारान्तकोकरूकोकरा + स = कोकरासकोकरेकोकरां + स = कोकरांस
'ए'कारान्तमडकेमडक्या + त = मडक्यातमडकीमडक्यां + त = मडक्यांत


From Smart School