निबंध :

१) माझा आवडता प्राणी - (कुत्रा)

२) माझा आवडता प्राणी - (मांजर) :

३) माझा आवडत प्राणी (सिंह) :१) माझा आवडता प्राणी - (कुत्रा) :(Go Top)

pavasala कुत्रा हा माझा आवडता प्राणी आहे. मी लहान होतो तेंव्हा आमच्याही घरी एक कुत्रा होता. त्याचे नाव मोती होते. थोडासा पिवळसर मोत्याच्या रंगा सारखा असल्यामुळे आम्ही त्याचे नाव मोती ठेवले होते. दाट लवलवीत केस, भरदार अंग आणि रुबाबदार चाल. चालताना त्याचे केस त्याच्या बरोबर नृत्य करत हेलकावे घेत असत. त्यामुळे तो गावातील साऱ्यांनाच आवडायचा.

मोती आमच्या बाबांचा खूप प्रिय होता. त्यालाही बाबांचाच जास्त लळा होता. सकाळी बाबांना बस स्टॉप पर्यंत सोडायला व संध्याकाळी बरोबर वेळ झाली की त्यांना आणायला बरोबर हजर असायचा. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा बस स्टॉप आमच्या घरापासून दीड किलोमीटर दूर आहे. तरीही मोती तेथे न चुकता बाबांच्या सोबत असायचा.

मोती आमच्या सोबतच जेवायचा, आम्ही जे खायचो तो ही तेच खायचा. मोती आमच्या घराची राखण करायचा. तो असल्यामुळे आम्हाला कधीच चिंता वाटली नाही. असा हा मोती मला खूप खूप आवडायचा.


२) माझा आवडता प्राणी - (मांजर):(Go Top)

मांजर हा माझा आवडता प्राणी आहे. आमच्याही घरी एक मांजर आहे. तिचे नाव मनी आहे. ती गुबगुबीत नि गोंडस जरी असली तरी तिचा आवाज खूपखूप बारीक आणि पातळ होता. म्हणूनच कदाचित माझ्या आजीने तिचे नाव मनी ठेवले असावे. मस्त पंढराशुभ्र रंग, डौलदार मिश्या आणि झुबकेदार शेपूट, आमच्या मनीची बातच न्यारी. खरंच आमची मनी आहेच देखणी.

मनी सकाळी दूध पिते. दुपारी आम्ही जे जेवण करतो ते ती खाते. घरात किरणा दुकान असल्यामुळे उंदीर होतेच. त्यामुळे मनीची जवळपास रोजच पार्टी होते. आमची मनी खूप शूरही आहे. पावसाळ्यात एकदा तिने घराजवळ आलेला सापही मारला होता. हि मनी जणू आमच्या घराची राखणच करते. कधी भूक लागल्यावर घरातील सर्वांच्या पायाजवळ जाऊन आपले अंग घासत, स्वतःलाच गोंजारून घेते. अशीही आमची प्रेमळ मनी मला खूप खूप आवडते.


३) माझा आवडत प्राणी (सिंह): (Go Top)

सिंह हा माझा आवडता प्राणी आहे. लहानपणा पासून आई, बाबा, आजी आणि शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टीतून सिंहाची खूप वाहवा ऐकली आहे. तसेच सिंह हा जंगलाचा राजा देखील आहे. त्यामुळे मलाही तो खूप आवडतो. बळकट शरीर, मजबूत पाय, धारदार नखे आणि रुबाबदार आयाळ यामुळे खरोखर तो जंगलाचा राजा शोभतो. जोरदार डरकाळीने संबंध जंगलाला हादरुन टाकतो.

लांब राकट शरीर, चपळाई आणि मजबूत टोकदार दात यामुळे तो, त्याच्याही पेक्ष्या मोठ्या प्राण्याची शिकार सहज करतो. मानेवरच्या आयाळी मुळे तो रुबाबदार तर दिसतोच, पण त्याच्यामुळे बऱ्याच वेळा सिंहाचे रक्षणही होते.

आम्हीतर तर त्याला प्राणी संग्रहालयातच पहिला आहे, पण तेथेही पाहताना भीती वाटते असे त्याचे रूप. खरंच असाहा बलशाली जंगलचा राजा माझा मित्र झाला तर किती माज्या येईल. त्याच्या याच पराक्रमामुळे मला तो खूप खूप आवडतो.


Check our Craft Channel

About Smart School Infolips


Complete the surveys and make money on Swagbucks

Craft

Visit our Informative site:
Infolips.com

Infolips

From Smart School