निबंध :

१) माझी आई

२) माझे बाबा


१) माझी आई : (Go Top)

pavasala माझी आई खूप छान आहे, ती माझ्यावर खूप प्रेम करते. आमच्या घरातील सर्वांची ती काळजी घेते. सकाळी आम्हाला नाष्टा बनवते, आम्हाला शाळेसाठी तयार करते. शाळेतून घरी आल्यावर खाऊ देते. संध्याकाळ झालीकी स्वतः देवपूजा करते व आम्हालाही देवाला नमस्कार करायला सांगते. घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करून अभ्यासाला बसवते. अश्याप्रकारे आमच्यावर चांगले संस्कार करते. मोठ्यांचा आदर ठेवायला शिकवते. आमचा अभ्यासही घेते व आमचे लाडही पुरवते.

आई सर्वांचीच काळजी घेते, पण खास करून माझी काळजी घेते. मी आजारी होतो तेंव्हा आई रात्र-रात्र माझ्या जवळच बसून होती. मला वेळच्यावेळी औषध देणे, माझा शाळेचा अभ्यासही घ्यायची. मी लवकर बरा व्हावा म्हणून, सारखी देवाची प्रार्थना करत असायची.

माझी काळजी घेत असताना, घरातील इतरांची ही काळजी घ्यायची. अशी ही माझी प्रेमळ आई माझ्यासाठी माझे दैवत आहे. खरंच माझी आई मला खूप-खूप आवडते.

।। आवडते मजला अफाट माझी आई,
तिच्या एका स्पर्शाने क्षीण दिवसाचा जाई. ।।२) माझे बाबा : (Go Top)

माझे बाबा खूप छान आहेत, ते माझ्यावर खूप प्रेम करतात. आमच्या घरातील सर्वांची ते काळजी घेतात, सर्वांवर त्यांचे लक्षही असते. सकाळी ऑफिसला जातात, संध्याकाळी घरी आल्यावर आमच्यासाठी खाऊ घेऊन येतात. स्वतः देवपूजा करतात व आम्हालाही देवाला नमस्कार करायला सांगतात. घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करून अभ्यास करायला सांगतात. अश्याप्रकारे आमच्यावर चांगले संस्कार करतात. मोठ्यांचा आदर ठेवायला शिकवतात. आमचा अभ्यासही घेतात व आमचे लाडही पुरवतात.

बाबा आम्हा सर्वांचीच काळजी घेतात, पण खास करून माझी काळजी घेतात. मी आजारी होतो तेंव्हा रात्र-रात्र माझ्या जवळच बसून राहायचे. मला वेळच्यावेळी औषध देणे, माझे पाढे घेणे, मला प्रोत्साहित करण्याचे काम करायचे. मी लवकर बरा व्हावा म्हणून, देवाची प्रार्थना ही करायचे.

आम्हाला गोष्टी सांगतात, त्यांच्या गोष्टी पुस्तकातल्या नसतात. त्यांच्या गोष्टीत बरेच शिकण्या सारखे असते. घरातील सर्वांची जबाबदारी ते घेत असतात. माझे बाबा म्हणजे आमच्या घराचे आधारस्तंभ आहेत. असे लाडके माझे बाबा मला खूप-खूप आवडतात.


Check our Craft Channel

About Smart School Infolips


Complete the surveys and make money on Swagbucks

Craft

Visit our Informative site:
Infolips.com

Infolips


From Smart School