Naam v Nammache Prakar - Smart Shool

नामाचे प्रकार :


नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत :

१] सामान्य नाम
२] विशेष नाम
३] भाववाचक नाम

१] सामान्य नाम (Common Nouns):

ज्या नावाने एकाच जातीचा किंवा वर्गाचा बोध केला जातो त्यास सामान्य नाम (सामायिक नाव) असे म्हणतात. (सामायिक म्हणजे Common सर्वांना मिळून एकत्र असणारे नाव).
- सामान्य नामे हि जातीवाचक असतात.
- म्हणजे एखाद्या वस्तूला ज्या नावाने ओळखले जाते ते त्या वास्तूचे सामान्य नाम होय.
उदा. पुस्तक, पक्षी, मुले, मुली, फळ, फूल, शहर, माणुस इ.

सामान्य नामाचे दोन प्रकार आहेत :
खरं तर मराठी मध्ये समुहवाचक आणि पदार्थवाचक नामांनाच सामान्य नाम म्हणतात, त्यांच्यातील विशेष फरकामुळे त्यांचे पुढील दोन भागात वर्गीकरण केले आहे.

अ] समुहावाचक नाम :(Collective Nouns) :
ज्या नावामुळे एखाद्या समुहाचा उल्लेख होतो त्या नावाला समूहवाचक नाम असे म्हणतात. (समुह म्हणजे collection सर्व वर्गाला दिलेले नाव).
- या शब्दामुळे एकाच जातीच्या समान वा सारख्या व्यक्ती, वस्तू, पक्षी वा प्राण्यांच्या समूहाचा बोध होतो.
उदा. सेना, वर्ग, समिती, थवा, संगणक, कळप इ.


आ] पदार्थवाचक नाम :(Material Nouns) :
जे पदार्थ किंवा वस्तू संख्येशिवाय इतर मापकांनी मोजल्या जातात त्यांना पदार्थवाचक नाम असे म्हणतात .
उदा. कपडा, सोने, चांदी, दूध, तांदूळ, तांबे इ.


२] विशेष नाम (Proper Nouns) :

ज्या नावामुळे एखाद्या जातीचा किंवा वर्गाचा बोध न होता विशिष्ट व्यक्तीचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात.
- विशेष नामे हि व्यक्तिवाचक असतात.
उदा. भारत, आकाश, मुंबई, नवी मुंबई, यमुना, जपान इ.३] भाववाचक नाम (Abstract Nouns) :

ज्या नावा मुळे प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेले गुण, धर्म, क्रिया, किंवा भावनां, तसेच दर्जा, स्थिती यांचा बोध होतो त्यास भाववाचक नाम असे म्हणतात.
- ज्या शब्दामुळे एखाद्या वस्तूची स्थिती, गुण किंवा भावना यांची माहिती होते त्या शब्दास भाववाचक नाम असे म्हणतात.
- भाववाचक नामे हि कल्पनेतील असून त्यांना वास्तविक अस्तित्व नसते.
उदा. प्रामाणिकपणा, ध्येर्य, चपळाई, विनोदी, हुशारी, चतुराई, चाल, जन्म, मृत्यु इ.
मराठी  विशेषण Quiz

-: छोटी प्रश्नोत्तरी :-

खालील छोटी प्रश्नोत्तरी सोबत आपण किती समजले त्याचे परीक्षण करूया.

अ) खालील वाक्यातून योग्य तो नामाचा प्रकार ओळखा :
१) मी एक पुस्तक वाचत आहे.
विशेष नाम
पदार्थवाचक नाम
समुहावाचक नाम
भाववाचक नाम

२) राहूल श्रीमंत आहे पण तो खूप दयाळू आहे .br>
विशेष नाम
समुहावाचक नाम
भाववाचक नाम
पदार्थवाचक नाम

३) मला आज रात्री आकाशात चंद्र दिसला नाही .
समुहावाचक नाम
भाववाचक नाम
विशेष नाम
पदार्थवाचक नाम

४) पाण्यात काठ्यांची मोळी तरंगत होती .
भाववाचक नाम
विशेष नाम
पदार्थवाचक नाम
समुहावाचक नाम

५) सोने खूप महाग आहे.
पदार्थवाचक नाम
समुहावाचक नाम
विशेष नाम
भाववाचक नाम

६) माणुसकी हा जगातील महान धर्म आहे .
विशेष नाम
पदार्थवाचक नाम
समुहावाचक नाम
भाववाचक नाम

७) बकऱ्यांचा कळप शेतात चरत होता.
विशेष नाम
समुहावाचक नाम
पदार्थवाचक नाम
भाववाचक नाम

८) भावीची हुशारीच तिच्या उपयोगी आली.
विशेष नाम
पदार्थवाचक नाम
भाववाचक नाम
समुहावाचक नामYour score is:

Correct answers:
Check our Craft Channel

About Smart School Infolips

From Smart School