Naam in Marathi - Smart School

नाम :

एखाद्या व्यक्तिला, वस्तुला, पक्षांना, प्राण्यांना, एखाद्या ठिकाणाला तसेच काल्पनिक घटक, व्यक्तीच्या भावना किंवा गुणांना दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात.

उदा. :
पेन, पुस्तक, भारत, संतोष, झाड, हत्ती, चिमणी, आंबा, पाणी, वारा, नदी, आकाश इ.

➥ विश्वातील प्रत्येक वस्तुला संबोधण्यासाठी नाव हे असतेच.
➥ खाली काही उदाहारणे पाहु म्हणजे आपल्या लगेच लक्षात येईल :

१) 'मुंबई' हे शहर म्हणजेच ठिकणाचे नाव आहे.
२) 'आत्मा' हे न दिसणाऱ्या घटकाचे नाव आहे.
३) 'स्वभाव' हे गुणाचे नाव आहे.
४) 'परी' हे काल्पनिक व्यक्तीचे नाव आहे.
५) 'खुर्ची' हे एका वस्तूचे नाव आहे.थोडक्यात : सजीव वा निर्जिव, सदृश्य वा अदृश्य किंवा काल्पनिक घटक, भावना वा गुणधर्माला दिलेले नाव म्हणजे 'नाम ' होय.

मराठी  विशेषण Quiz

-: छोटी प्रश्नोत्तरी :-

खालील छोटी प्रश्नोत्तरी सोबत आपण किती समजले त्याचे परीक्षण करूया.

अ) खालील वाक्यातून योग्य तो नाम ओळखा :

१) मी एक पुस्तक वाचत आहे.
मी
एक
पुस्तक
वाचत

२) राहूल श्रीमंत आहे पण तो खूप दयाळू आहे.
श्रीमंत
राहुल
खूप
दयाळू

३) मला आज रात्री आकाशात चंद्र दिसला नाही.
दिसला
आकाशात
मला
चंद्र

४) पाण्यात फळी तरंगत होती.
पाण्यात
फळी
तरंगत
होती

५) गंगा नदी पवित्र आहे.
गंगा
नदी
पवित्र
आहे

६) माणुसकी हा जगातील महान धर्म आहे.
जगातील
धर्म
महान
माणुसकी

७) हत्तीची सोंड खूप बलवान असते.
हत्तीची
सोंड
खूप
बलवान

८) सूर्य सर्व जगाला प्रकाश देतो.
प्रकाश
सर्व
जगाला
सूर्यYour score is:

Correct answers:

Check our Craft Channel

About Smart School Infolips

From Smart School