Kevalprayogi Avyay - Smart School

केवलप्रयोगी अव्यय (Interjection) :

ज्या शब्दाव्दारे वाक्यातुन आपल्या मनातील आनंद, आश्चर्य, दु:ख, प्रशंसा अश्या भावना व्यक्त केल्या जातात त्या अविकारी शब्दाला केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदा. : वा, अच्छा, अरेरे, छान, बापरे इ.
➥ बापरे ! केवढा मोठा हत्ती.
➥ अरेरे ! खूप वाईट झाले.
➥ छान ! असेच चांगले काम करत रहा.

➤ वरील वाक्यात "बापरे", "अरेरे" छान "पण" ही केवलप्रयोगी अव्यय आहेत.

➽ केवलप्रयोगी अव्यय या "!" चिन्हा द्वारे दर्शविले जाते.

➽ केवलप्रयोगी अव्ययाचे प्रकार :
केवलप्रयोगी अव्ययाचे नऊ प्रकार आहेत.

१) हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय :
ज्या केवलप्रयोगी अव्यया व्दारे वाक्यात आनंद किंवा हर्ष अश्या भावना व्यक्त केल्या जातात अश्या अविकारी शब्दांना हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदा. : ओ-हो, अहाहा, अहा, वा, वाहवा, वा-वा इ.
➥ ओ-हो ! किती उतुंग षटकार मारला आहे.
➥ अहाहा ! किती सुंदर चित्र आहे.
➥ अहा ! किती चविष्ट फळ आहे.

➤ वरील वाक्यात "ओ-हो", "अहाहा" आणि "अहा" ही केवलप्रयोगी अव्यय आहेत.

२) शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय :
ज्या केवलप्रयोगी अव्यया व्दारे वाक्यात दुःख किंवा व्यथा अश्या भावना व्यक्त केल्या जातात अश्या अविकारी शब्दांना शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदा. : आई ग, हाय, हायहाय, अगाई, ऊं, अं, अरेरे इ.
➥ अरेरे ! खूपच वाईट घडले.
➥ आई ग ! किती जोरात लागलं त्याला.
➥ ऊं ! असं व्हायला नको होतं.

➤ वरील वाक्यात "अरेरे", "आई ग" आणि "ऊं" ही केवलप्रयोगी अव्यय आहेत.

३) आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय :
ज्या केवलप्रयोगी अव्यया व्दारे वाक्यात आश्चर्याच्या भावना व्यक्त केल्या जातात अश्या अविकारी शब्दांना आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदा. : बापरे, अरेच्या, अबब, ऑ, अहाहा, ओ, ओहो इ.
➥ अबब ! किती विशाल महासागर हा.
➥ अरेच्या ! तू खरंच पास झालास.
➥ बापरे ! किती मोठं पटांगण हे.

➤ वरील वाक्यात "अबब", "अरेच्या" आणि "बापरे" ही केवलप्रयोगी अव्यय आहेत.

४) प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय :
ज्या केवलप्रयोगी अव्यया व्दारे मनातील प्रशंसा व्यक्त केली जाते अश्या अविकारी शब्दांना प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदा. : छान, ठीक, शाब्बास, वाहवा, भले, फक्कड इ.
➥ शाब्बास ! अखेर तू जिंकलास.
➥ छान ! तुझा खेळ लयबद्द आहे.
➥ वाहवा ! किती सुबक कलाकृती आहे.

➤ वरील वाक्यात "शाब्बास", "छान" आणि "वाहवा" ही केवलप्रयोगी अव्यय आहेत.


५) संमतीदर्शक केवलप्रयोगी अव्यय :
ज्या केवलप्रयोगी अव्यया व्दारे संमती देण्या-घेण्याची भावना व्यक्त केली जाते अश्या अविकारी शब्दांना संमतीदर्शक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदा. : बराय, अच्छा, ठीक, जीहा, हा, इ.
➥ बराय ! मी येतो काळजी घे.
➥ अच्छा ! तू जाऊ शकतोस.
➥ ठीक ! तू उद्या आला तरी चालेल.

➤ वरील वाक्यात "बराय", "अच्छा" आणि "ठीक" ही केवलप्रयोगी अव्यय आहेत.

६) विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय :
ज्या केवलप्रयोगी अव्यया व्दारे विरोध दर्शविण्याची भावना व्यक्त केली जाते अश्या अविकारी शब्दांना विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदा. : छे, अहं, ऊं, हॅट, हू, छट, छेछे, च. इ.
➥ छे ! ते मला नाही आवडत.
➥ छे-छे ! असलं काम मी कधीच करत नाही.
➥ अहं ! तू हे साहस करू नकोस.

➤ वरील वाक्यात "छे", "छे-छे" आणि "अहं" ही केवलप्रयोगी अव्यय आहेत.

७) तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय :
ज्या केवलप्रयोगी अव्यया व्दारे तिरस्कार किंवा व्देश दर्शविण्याची भावना व्यक्त केली जाते अश्या अविकारी शब्दांना तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदा. : शी, हुड, शु, हत, छत, शिक्क, इश्श, हुडत, फुस, छी इ.
➥ शी ! किती घाणेरडी जागा आहे हि.
➥ छी ! कात विचित्र आह ते.
➥ हुड ! मी नाही खाणार.

➤ वरील वाक्यात "शी", "छी" आणि "हुड" ही केवलप्रयोगी अव्यय आहेत.

Nouns : The name given to a people, objects, birds.... Read more...

८) संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय :
ज्या केवलप्रयोगी अव्यया व्दारे इतरांना संबोधून आपल्या मनातील भावना व्यक्त केली जाते अश्या अविकारी शब्दांना संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदा. : अहो, ए, अग, अरे, अगो, बा, रे इ.
➥ ए ! चल जाऊ या.
➥ अहो ! ऐकलत का.
➥ अग ! बस्स झालं आता.

➤ वरील वाक्यात "ए", "अहो" आणि "अग" ही केवलप्रयोगी अव्यय आहेत.

९) मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय :
ज्या केवलप्रयोगी अव्यया व्दारे इतरांना मौन राहण्याच्या सूचना देण्याची भावना व्यक्त केली जाते अश्या अविकारी शब्दांना मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदा. : चुप, चुपचाप, गुपचुप, गप इ.
➥ गप ! माझ्याशी बोलू नको.
➥ चूप ! अभ्यास कर.
➥ चुपचाप ! तुझं काम कर.

➤ वरील वाक्यात "गप", "चूप" आणि "चुपचाप" ही केवलप्रयोगी अव्यय आहेत.

मराठी  विशेषण Quiz

-: छोटी प्रश्नोत्तरी :-

खालील छोटी प्रश्नोत्तरी सोबत आपण किती समजले त्याचे परीक्षण करूया.

➤ खालील वाक्यातून केवलप्रयोगी अव्ययचा प्रकार ओळखा :

१) अहाहा ! किती सुंदर चित्र आहे.
हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय
शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय
आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय

२) अरेच्या ! तू खरंच पास झालास.
हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय
शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय
आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय

३) आई ग ! किती जोरात लागलं त्याला.
हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय
शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय
आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय

४) वाहवा ! किती सुबक कलाकृती आहे.
हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय
शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय
प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय

५) अच्छा ! तू जाऊ शकतोस.
संमतीदर्शक केवलप्रयोगी अव्यय
शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय
प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय

६) अहं ! तू हे साहस करू नकोस.
संमतीदर्शक केवलप्रयोगी अव्यय
विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय
प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय

७) शी ! किती घाणेरडी जागा आहे हि.
तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय
विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय
प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय

८) चुपचाप ! तुझं काम कर.
तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय
विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय
मौनदर्शक केवलप्रयोगी अव्ययYour score is:

Correct answers:


Check our Craft Channel

About Smart School Infolips

From Smart School