Samanyarupe, Vibhakti-Smart School Infolips

काळ व त्याचे प्रकार :

काळ ( Tense) :

एखाद्या वाक्यातील क्रियापदावरून त्या वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडली आहे याचा बोध होतो, त्या वेळेला त्या वाक्याचा ‘काळ’ असे म्हणतात.

मराठीत काळाचे प्रमुख तीन प्रकार आहेत.
१) वर्तमान काळ
२) भूतकाळ
३) भविष्यकाळ

वर्तमान काळभूतकाळभविष्यकाळ
साधा भावी आंबा खाते. भावीने आंबा खाल्ला. भावी आंबा खाईल.
चालू भावी आंबा खात आहे. भावी आंबा खात होती. भावी आंबा खात असेल.
पूर्ण भावीने आंबा खाल्ला आहे. भावीने आंबा खाल्ला होता. भावीने आंबा खाल्ला असेल.
चालू पूर्ण भावी रोज आंबा खाते. भावी रोज आंबा खात असे. भावी रोज आंबा खात राहील.


➤ चला प्रत्येक प्रकार तपशीलवार पाहू.

१) वर्तमानकाळ :
वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून क्रिया आता घडत आहे असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘वर्तमानकाळ’ असे समजावे.

उदा. :
➥ भावी चिकू खाते.
➥ वेदांती शाळेत जात आहे.
➥ ग्रीष्मा खो-खो खेळते.
➥ राजेश क्रिकेट खेळतो.

वर्तमान काळाचे चार उपप्रकार पडतात.
अ) साधा वर्तमान काळ :
वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून क्रिया आता घडत आहे असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘साधा वर्तमान काळ’ असे समजावे.

उदा. :
➥ भावी आंबा खाते.
➥ वेदांती शाळेत जाते.
➥ निल अभ्यास करतो.
➥ विजय पोहायला जातो.

आ) अपूर्ण वर्तमान काळ/ चालू वर्तमान काळ :
वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून क्रिया अजून चालू आहे असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘चालू वर्तमान काळ’ असे समजावे.

उदा. :
➥ भावी आंबा खात आहे.
➥ वेदांती शाळेत जात आहे.
➥ निल अभ्यास करत आहे.
➥ विजय पोहायला जात आहे.

इ) पूर्ण वर्तमान काळ :
वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून क्रिया वर्तमानकाळातील असून ती आत्ताच पूर्ण झालेली आहे असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘पूर्ण वर्तमान काळ’ असे समजावे.

उदा. :
➥ भावीने आंबा खाल्ला आहे.
➥ वेदांती शाळेत गेली आहे.
➥ निलने अभ्यास केला आहे.
➥ विजय पोहायला गेला आहे.

ई) रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ :
एखाद्या वाक्यातील क्रिया वर्तमानकाळातील असून ती क्रिया सातत्त्याने घडत असल्याचा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘चालू पूर्ण वर्तमानकाळ’ असे समजावे.

उदा. :
➥ भावी रोज आंबा खाते.
➥ वेदांती दररोज शाळेत जाते.
➥ निल रोज अभ्यास करतो.
➥ विजय नेहमी पोहायला जातो.

Nouns : The name given to a people, objects, birds....

Read more...

२) भूतकाळ :
वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून क्रिया घडून गेली आहे असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘भूतकाळ’ असे समजावे.

उदा. :
➥ भावीने चिकू खाल्ला.
➥ वेदांती शाळेत गेली.
➥ ग्रीष्मा खो-खो खेळली.
➥ राजेश क्रिकेट खेळला.

भूतकाळ काळाचे चार उपप्रकार पडतात.
अ) साधा भूतकाळ काळ :
वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून क्रिया आधीच घडून झाली आहे असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘साधा भूतकाळ काळ’ असे समजावे.

उदा. :
➥ भावीने आंबा खाल्ला.
➥ वेदांती शाळेत गेली.
➥ निलने अभ्यास केला.
➥ विजय पोहायला गेला.

आ) अपूर्ण भूतकाळ काळ/ चालू भूतकाळ काळ :
वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून भूतकाळात घडलेली क्रिया अजून चालू आहे असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘चालू भूतकाळ काळ’ असे समजावे.

उदा. :
➥ भावी आंबा खात होती.
➥ वेदांती शाळेत जात होती.
➥ निल अभ्यास करत होता.
➥ विजय पोहायला जात होता.

इ) पूर्ण भूतकाळ :
वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून क्रिया भूतकाळात घडून पूर्ण झाली आहे असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘पूर्ण भूतकाळ’ असे समजावे.

उदा. :
➥ भावीने आंबा खाल्ला होता.
➥ वेदांती शाळेत गेली होती.
➥ निलने अभ्यास केला होता.
➥ विजय पोहायला गेला होता.

ई) रीती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ :
एखाद्या वाक्यातील क्रिया भूतकाळातील असून ती क्रिया सातत्त्याने घडत असल्याचा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘चालू पूर्ण भूतकाळ’ असे समजावे.

उदा. :
➥ भावी रोज आंबा खात असे.
➥ वेदांती दररोज शाळेत जात असे.
➥ निल रोज अभ्यास करत असे.
➥ विजय नेहमी पोहायला जात असे.


३) भविष्यकाळ :
वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून क्रिया पुढे होणार आहे असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘भविष्यकाळ’ असे समजावे.

उदा. :
➥ भावी चिकू खाईल.
➥ वेदांती शाळेत जाईल.
➥ ग्रीष्मा खो-खो खेळेल.
➥ राजेश क्रिकेट खेळेल.

भविष्यकाळ काळाचे चार उपप्रकार पडतात.

अ) साधा भविष्यकाळ काळ :
वाक्यातील क्रिया येणाऱ्या काळात होणार आहे असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘साधा भविष्यकाळ काळ’ असे समजावे.

उदा. :
➥ भावी आंबा खाईल.
➥ वेदांती शाळेत जाईल.
➥ निल अभ्यास करील.
➥ विजय पोहायला जाईल.

आ) अपूर्ण भविष्यकाळ काळ/ चालू भविष्यकाळ काळ :
वाक्यातील भविष्यात होणारी क्रिया चालू असेल, पण पूर्ण झालेली नसेल असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘चालू भविष्यकाळ काळ’ असे समजावे.

उदा. :
➥ भावी आंबा खात असेल.
➥ वेदांती शाळेत जात असेल.
➥ निल अभ्यास करत असेल.
➥ विजय पोहायला जात असेल.

इ) पूर्ण भविष्यकाळ :
वाक्यातील भविष्यकाळात होणारी क्रिया पूर्ण झाली असल्याचा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘पूर्ण भविष्यकाळ’ असे समजावे.

उदा. :
➥ भावीने आंबा खाल्ला असेल.
➥ वेदांती शाळेत गेली असेल.
➥ निल अभ्यास केला असेल.
➥ विजय पोहायला गेला असेल.

ई) रीती भविष्यकाळ / चालू पूर्ण भविष्यकाळ :
एखाद्या वाक्यातील क्रिया भविष्यकाळातील असून ती क्रिया सातत्त्याने घडत राहणारी असेल आसा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘चालू पूर्ण भविष्यकाळ’ असे समजावे.

उदा. :
➥ भावी रोज आंबा खात राहील.
➥ वेदांती दररोज शाळेत जात राहील.
➥ निल रोज अभ्यास करत जाईल.
➥ विजय नेहमी पोहायला जात राहील.

Published by : Smart School


मराठी  विशेषण Quiz

-: छोटी प्रश्नोत्तरी :-

खालील छोटी प्रश्नोत्तरी सोबत आपण किती समजले त्याचे परीक्षण करूया.

खालील वाक्यातील योग्य काळाचा प्रकार ओळखा :
१) विजय नेहमी पोहायला जात राहील.
पूर्ण वर्तमान काळ
चालू पूर्ण भविष्यकाळ
पूर्ण भूतकाळ

२) निलने अभ्यास केला आहे.
पूर्ण वर्तमान काळ
ससाधा वर्तमान काळ
चालू भूतकाळ काळ

३) निलने अभ्यास केला होता.
पूर्ण वर्तमान काळ
पूर्ण भूतकाळ
साधा भूतकाळ काळ

४) भावीने आंबा खाल्ला.
पूर्ण भूतकाळ
अपूर्ण भूतकाळ काळ
साधा भूतकाळ काळ

५) वेदांती शाळेत जाते.
साधा वर्तमान काळ
साधा भूतकाळ काळ
पूर्ण भूतकाळ

६) वेदांती शाळेत जात असेल.
पूर्ण भविष्यकाळ
चालू भविष्यकाळ काळ
चालू पूर्ण वर्तमानकाळ

७) तन्मयी शाळेत जात होती.
चालू पूर्ण भूतकाळ
चालू भूतकाळ काळ
चालू पूर्ण वर्तमानकाळ

८) ग्रीष्मा आंबा खात आहे.
चालू पूर्ण वर्तमानकाळ
चालू भूतकाळ काळ
चालू वर्तमान काळ

९) विजय नेहमी पोहायला जात असे.
चालू पूर्ण भूतकाळ
चालू भूतकाळ काळ
चालू वर्तमान काळ

१०) भावी आंबा खाईल.
रीती भूतकाळ
पूर्ण भविष्यकाळ
साधा भविष्यकाळ काळYour score is:

Correct answers:

Check our Craft Channel

About Smart School Infolips

From Smart School